शेतकऱ्यांची बंधनांपासून मुक्तता करा, त्यांच्या पायातील शेतकरीविरोधी कायद्यांच्या बेड्या काढा.
पंतप्रधानांना असे म्हणायचे आहे का, शेतकऱ्यांना ज्वारी, बाजरी, नाचणी यांपासून बनवलेले अन्नपदार्थ माहीत नाहीत? का ही जाणीव जागृती बिगर शेतकऱ्यांसाठी आहे? कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गुजरात येथील ग्रामीण नागरिकांना हे सर्व माहीत आहे. पंतप्रधानांनासुद्धा काठीयावाडी ‘भाणू’ म्हणजे जेवणामध्ये बाजरीची भाकरी असते, हे माहीत असेलच. या धान्यांची किफायतशीर शेती करायची असेल तर कमीत कमी जमीन धारणा किती पाहिजे?.......